बचत गटांना दिलेल्या कर्जाची रक्कम व्याज दराने दिली जाते – रवी पाळेकर

0
262
 देवगड : देवगड पंचायत समितीची मासिक सभा देवगड पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती जयश्री आडीवरेकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. देवगड तालुक्यात बचतगट सक्षम करण्यासाठी शासनाकडून जे कर्ज वाटप करण्यात आली त्या कर्जाची रक्कम 2% दराने व्याजाने पैसे देण्यासाठी केली जाते. संबंधित अधिकारी यांच्या सांगण्यानुसारच बचत गटांना देण्यात आलेले कर्जाची रक्कम व्याजाने दिली जात आहे. असा आरोप पं. स. मासिक सभेत सदस्य रवी पाळेकर यांनी केला. तसेच बचत गटांना दिलेल्या कर्जाची रक्कमेची सविस्तर माहिती व केलेले व्यवहार पुढील मिटिंग पूर्वी जर पूर्ण केले नाही तर संबंधित अधिकारी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही सदस्य रवि पाळेकर यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या तर तरळा या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद बापर्डे व जिल्हा परिषद फणसगाव या दोन जिल्हा परिषद गणांचा समावेश करावा, अशी मागणी   सदस्य लक्ष्मण तथा रवी पाळेकर यांनी केली. याबाबतचा तसा ठरावही घेण्यास त्यांनी सांगितले. शासनाचा चौदावा वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात येतो. मात्र प्रत्यक्षात डाटा ऑपरेटर व वीज बिल यासाठी खर्च होतो. मग मंजूर कामाना निधी वापरायचा कसा ? यासाठी ग्रामपंचायतीच्या वीज बिलासाठी ५० टक्के रक्कम जिल्हा परिषद सेस फंडातून देण्यात यावी. अशी मागणी सदस्य अजित कांबळे व सदाशिव ओगले यांनी केली आहे. देवगड तालुक्यात सध्या बीएसएनएल लॅण्डलाईन व मोबाईल सेवा वारंवार कोलमडलेली असल्याने सर्वाचीच या सेवेबद्दल नाराजी आहे. प्राथमिक आरोग्य  केंद्र इळये मधील इंटरनेट सेवा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद आहे. सेवा सुरळीत न केल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा सदस्य रवी पाळेकर यांनी दिला आहे. तालुक्यातील शिक्षण व्यवस्था भकास होत चालली आहे. बोगस पद्धतीने काही शाळा तालुक्यात सर्रास सुरू आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र संबंधित शाळांबाबतची माहिती देवगड शिक्षण विभागाकडे नाही.  या सर्व शाळांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच तालुक्यातील काही शाळांतील शिक्षक कॉन्ट्रॅक्ट घेत असल्याचा आरोप सदस्य सदाशिव ओगले यांनी केला. याचबरोबर या सभेत शिक्षण, आरोग्य, वीज वितरण, ग्रामीण पाणी पुरवठा, एसटी आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब उपसभापती संजय देवरुखकर सर्व पंचायत समिती सदस्य सदस्या व सर्व खाते अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here