मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनाला ‘टाळे लावा’ आंदोलन

0
282

मुंबई : परीक्षा भवनाच्या भोंगळ कारभारमुळे मुंबई विद्यापीठाने ३५ हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केले. गेल्या काही वर्षांपासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास उडाला आहे. मागच्या आठवड्यात माननीय उच्च न्यायलयाने सांगितले की परीक्षा भवन चालवता येत नसेल तर टाळा लावा. म्हणून आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात ‘टाळे लावा’ आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणा दिल्या. त्यावेळी विद्यापीठाकडून परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुले यांनी निवेदन स्वीकारले.कारण मागील वर्षाच्या परीक्षेच्या निकालाबाबत बोलायचं झालं तर ९७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. त्यापैकी ३५हजार म्हणजेच सुमारे ३६ टक्के विद्यार्थ्यांना चुकून नापास केल्याची करामत विद्यापीठाने केली आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. गेल्या वर्षाचा निकाल आल्यानंतर सुमारे ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी रिचेकिंसाठी अर्ज केला होता. हा आकडा विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा आहे. तसंच हा आकडा विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास कमी झाल्याचंही दर्शवतो. रिद्धी परब टी.वाय.बीकॉमला पास असून चुकून नापासचा शेरा सहन न झाल्यामुळे विद्यार्थीनीने आत्महत्या केली. बोरिवलीतील वालिया कॉलेजमध्ये शिकणारी रिद्धी परब या विद्यार्थिनीने एका विषयात नापास झाल्यामुळे आयुष्य संपवले होते. परंतु, ती पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण असल्याचे स्पष्ट झाले. कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये रिद्धीच्या पालकांची भेट घेतली. यावेळी परब कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असे कोरडे सांत्वन केले. रिद्धीच्या पालकांना शासकीय आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी मातेले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here