रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याचा दोडामार्ग आरपीआय कडून निषेध

0
209
दोडामार्ग : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या हल्ल्याविरोधात निषेध नोंदवून हल्लेखोरांची कसून चौकशी करावी या मागणीसाठी गुरुवारी दोडामार्ग तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात आले. तीन तास हे धरणे धरल्यानंतर तहसीलदार व पोलिसांना निवेदन देण्यात आले. केंद्रीय मंत्री तथा लोकनेते आठवले यांच्यावरील निंदनिय हल्ल्याने जनतेच्या भावना दुखावल्या असून आठवले यांच्या संरक्षणात वाढ करावी अशी मागणी केली आहे. या आंदोलनात आरपीआयचे प्रदेश पदाधिकारी रामांकात जाधव, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सखाराम कदम व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here