अखेर वैभववाडी शहराला मिळाले वायरमन ; उपनगराध्यक्ष संपदा राणे यांच्या प्रयत्नांना यश

0
410

वैभववाडी : वाभवे वैभववाडी शहरातील रिक्त असलेल्या वायरमन पदांसाठी तीन जणांची महाराष्ट्र विद्युत महा.मंडळाने तात्पुरती नियुक्ती केली आहे. गेले कित्येक महीने ही पद रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती.याबाबत उपनराध्यक्षा संपदा राणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. वैभववाडी शहरातील वायरमन पद गेल्या कित्येक दिवसापासून रिक्त होते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या विषयात उपनराध्यक्षा संपदा राणे यांनी लक्ष घातले. शहराला वायरमन न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा उपनराध्यक्षा राणे यांनी दिला होता.त्यांच्या या मागणीची दखल घेऊन विद्युत महामंठाळाने शहरासाठी तीन वारमनची नियुक्ती केली आहे. याबाबतचे पत्र कंपनीने श्रीमती राणे यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here