आंतरराज्य रविंद्र करंडक खुली एकांकिका स्पर्धा-२०१९ चे मंगळवारी उद्घाटन

0
250

देवगड : श्री. स. ह. केळकर महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आंतरराज्य रविंद्र करंडक खुली एकांकिका स्पर्धा-२०१९ चे आयोजन दि. ८ ते १० जानेवारी २०१९ या तीन दिवसांत महाविद्यालयात करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी निवडक ११ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. ८ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.‘समाप्त’(वेळ-७वा. नांदी क्रिएशन,दापोली लेखक सागर माने व दिग्दर्शक चंद्रशेखर मुळे), ‘अमन’(वेळ-८वा. चतुरंग प्रोडक्शन,गणेशगुळे लेखक चंद्रशेखर मुळे,सागर माने व दिग्दर्शक चंद्रशेखर मुळे), ‘सुरकुत्या’(वेळ-९वा. स्नेहबंध,रत्नागिरी लेखक कुणाल जामसंडेकर व दिग्दर्शक प्रथमेश मांडवकर) या एकांकिका तर ९ जानेवारीला ‘अशांती पर्व’(वेळ-६वा. अभिनय,कल्याण लेखक जयंत पवार व दिग्दर्शक अभिजित झुंजारराव), ‘भगदाड’(वेळ-७वा. कलांकुर ग्रुप,मालवण लेखक अभिषेक गावकर व दिग्दर्शक रुपेश नेवगी), गावपळण’(वेळ-८वा. नाट्यावलय,रत्नागिरी लेखक प्रशांत पवार व दिग्दर्शक साई शिर्सेकर), ‘अपूर्णांक’(वेळ-९वा. व्हाईट शॅडो प्रोडक्शन,चिपळूण लेखक व दिग्दर्शक स्मितेज कदम), ‘कॅलिडीओ स्कोप’(वेळ-१०वा. चौकट क्रिएशन,रत्नागिरी) या एकांकिका होणार असून १० जानेवारीला ‘नेकी’ (वेळ-६वा. GMCKS क्रिएशन,सिंधुदुर्ग लेखक इरफान मुजावर व दिग्दर्शक सोनल उतेकर), ‘अनाहुत’(वेळ-७वा श्री समर्थ कलाविष्कार ग्रुप,देवगड लेखक राजेंद्र बोडेकर व दिग्दर्शक विजय कदम), ‘कलंदर’(वेळ-८वा नाटकवेडी माणसे,कणकवली लेखक बिजेश संघमित्रा व दिग्दर्शक अभय खडपकर) या एकांकिका होणार आहेत. राज्यशासनामार्फत आयोजित रंगवैखरी व लोकसत्ता लोकांकिका या नामांकित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिमफेरीमध्ये गाजलेली श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाची ‘फुगडी’ एकांकिका याच दिवशी १० वा खास आकर्षण म्हणून दाखविण्यात येणार आहे.* त्यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे. प्रथम क्रमांकासाठी १०,०००/-, द्वितीय क्रमांकासाठी ८,०००/-, तृतीय क्रमांकासाठी ६,०००/- व आकर्षक चषक व वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here