मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी राज ठाकरेंचे केले स्वागत

0
317

मालवण : आंगणेवाडी भराडी देवीच्या दर्शनासाठी मालवण दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मालवणात मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाअध्यक्ष अमित इब्रामपूरकर व तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मनसे तालुका सचिव विल्सन गिरकर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष पास्कोल रॉड्रीक्स यासह अन्य उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंसोबत राज ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, शिवडी विधानसभा सचिव नंदु घाडीगावकर, गोरेगाव विधानसभा राजु साटम, परशुराम उपरकर आदी उपस्थित होते. यावेळी आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्ताने तालुका मनसेतर्फे भरवण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राज ठाकरे यांनी केले. तर स्वतःच्याच कुंचल्यातुन साकारलेल्या प्रदर्शनाची केलेली पाहणी हा चर्चेचा विषय ठरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here