ज्ञानदीप शिक्षण मंडळाचा रविवारी स्नेहमेळावा व पुरस्कार वितरण सोहळा 

0
164
सावंतवाडी : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण मंडळाचा वार्षिक स्नेहमेळावा व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी २८ एप्रिल रोजी सकाळी १० : ३० वा. राणी पार्वती देवी हाय. व ज्यू. कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. सुभाष पणदूरकर, प्रमुख अतिथी युवराज लखमराजे भोसले, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, राजेंद्र गुरव, शहाजान शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्नेहमेळावा होणार आहे. यावेळी गुरुजी शहाजान शेख संत साहित्याची समाजाला गरज या विषयावर व्याख्यानपर मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,संगीत,पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये विशेष सामाजिक, शैक्षणिक कार्यसेवा पुरस्कार राजेंद्र माणगावकर -कणकवली,शैक्षणिक कार्यसेवा नीता सावंत – कुणकेरी-सावंतवाडी, संगीत कार्यसेवा नितीन धामापूरकर – कुडाळ, पत्रकारिता कार्यसेवा पुरस्कार दै. प्रहारचे सचिन रेडकर – सावंतवाडी यांचा गौरव होणार आहे. तसेच ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध,काव्यलेखन व चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे संस्थापक वाय.पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष एस.जी.साळगावकर, खजिनदार एस.आर. मांगले, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गांवस, प्रज्ञा मातोंडकर, एस.एस.तकिलदार, आर. व्ही. नारकर, सतीश राऊळ, संप्रवी कशाळीकर, किशोर वालावलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here