सावंतवाडी : कोकणचं महाचॅॅनेल सिंधदुर्ग लाईव्हचं नव्या सुसज्ज जागेत, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शानदार स्थलांतर झालं. हॉटेल उद्योजक महेश कुमठेकर आणि उद्योजिका रेखा कुमठेकर यांच्या हस्ते नव्या कार्यालयाच उद्घाटन करण्यात आल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन सिंधुदुर्ग लाईव्हच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोकणवासीयांच पहिल्या पसंतीच चॅॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह यशस्वी वाटचाल करतं आहे. अनेक आव्हान पेलत यशाची क्षितीज गाठणाऱ्या सिंधुदुर्ग लाईव्हसोबत आज अनेक लोकांची कनेक्टीविटी वाढत आहे. त्याचमुळे सिधुदुर्ग लाईव्हन नव्या विस्तारित जागेत अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरस्थलांतर केलं. या प्रसंगी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत सिंधुदुर्ग लाईव्हच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यम तज्ञ आणि मुख्यमंत्र्यांचे माजी स्वीय सहायक सतिश पाटणकर, माजी आमदार राजन तेली, दै. प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, लोकसत्ताचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, निवृत्त प्राचार्य गिरीधर परांजपे, दैनिक पुढारीचे हरिश्चंद्र पवार, दैनिक प्रहारचे सचिन रेडकर, आश्फाक शेख, समीर कदम, राजाराम धुरी, मानवाधिकार संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित वेंगुर्लेकर, बांधकामचे शाखा अभियंता विनायक चव्हाण, तरुण भारतचे उपसंपादक राजेश मोंडकर स्वाभिमानच्या सावंतवाडी महिला शहराध्यक्षा मोहीनी मडगावकर, चर्मकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दिलीप इन्सुलकर, सौ. इन्सुलकर, राजकुमार चव्हाण, गणेश म्हापणकर, कवयित्री सरिता पवार, प्राध्यापिका श्रीमती कांबळे, वाय. पी. नाईक, संतोष गावस, संदीप जंगले, भाजपा सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग, सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती आनंद नेवगी, माजी सरपंच संदीप हळदणकर, प. पु. राणे महाराज यांचे शिष्य प्रकाश चोनकर, हॉटेल उद्योजक आबा कोटकर, गिरीश तुळसकर, बाळा नमशी, प्रसन्न गोंदावले माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक तसेच सिंधुदुर्ग लाईव्हचे सर्व रीपोट उपस्थित होते.
बाईट :