राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये कुडाळ, ओरोस मधील विद्यार्थ्यांची बाजी

0
102

कुडाळ : राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये कुडाळ, ओरोस मधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे… कुडाळ मधील प्रारब्ध बरडे गौरवला चॅम्पियन चा किताब मिळाला आहे…ओझर येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा मास्टर अबॅकस व पामा इंडिया यांनी आयोजित केला होता . त्यामध्ये एकूण १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग केला होता . त्यातून कुडाळ व ओरोस मधील विध्यार्थी सहभाग होऊन तिथे कोकण चे नाव विजयाच्या तक्त्यावर कोरले आहे.. यातील विजेते लहान वयोगटात प्रारब्ध बरडे चॅम्पियन , हर्षला गोसावी( जी. प. शाळा पडतेवाडी ) प्रथम क्रमांक, निकिता सावंत (कुडाळ हायस्कूल ), शमिका अरवंडेकर ( जी. प. शाळा पडतेवाडी ),  श्रावणी अरवंडेकर ( जी. प. शाळा पडतेवाडी ), मनस्वी झेंडे ( जी. प. शाळा पडतेवाडी ),  चिन्मयी गाईडोळे (डॉन बॉस्को ओरोस) अनुक्रमे द्वितीय क्रमांक ,  सई कांबळी ( जी. प. शाळा पडतेवाडी ) ,  चैतन्य ठाकूर ( डॉन बॉस्को ओरोस ) अनुक्रमे त्रितीय क्रमांक ,  गीत गोसावी ( जी. प. शाळा पडतेवाडी ) ,  हितेश मुंज ( कुडाळ हायस्कूल ) अनुक्रमे चौथा क्रमांक . यांना प्रशिक्षण म्हणून लाभलेले मास्टर अबॅकस चे चेअरमन शिवराज पाटील सर , अविनाश भिसे सर , समर्थ अकॅडमी कुडाळ, डॉन बॉस्को स्कूल ओरोस, कुडाळ हायस्कूल कुडाळ, जी. प. शाळा पडतेवाडी व सर्व पालक वर्ग सर्वांचे अभिनंदन होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here