पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा शेतकरी मित्रांनी लाभ घ्यावा : महेश सारंग यांचे आवाहन

0
126

सावंतवाडी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हेतूने शेतकरी कुटुंबा करिता दोन हेक्‍टरपर्यंत धारणा मर्यादा होती ती मर्यादा केंद्र शासनाने शिथील केली असून बाकी अटी व शर्ती कायम ठेवले आहेत योजने अंतर्गत सर्व शेतकरी पात्र कुटुंबांना प्रतिवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वितरीत करण्याबाबत माननीय कृषी आयुक्त कार्यालयामार्फत दिनांक १३ जून २०१९ रोजी मा. तहसीलदार यांना पत्रान्वये सूचित केले आहे आहे याच अनुषंगाने सर्व पात्र शेतकरी यांनी आपले बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक त्याची झेरॉक्स दिनांक ३० जून २०१९ पर्यंत तहसीलदार कार्यालयात किंवा आपल्या गावात नेमून देण्यात आलेल्या कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करावे यासंदर्भात कोणतीही शंका असल्यास सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क करावा तसेच या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here