‘त्या’ ग्रामसेवकाला अणाव ग्रामपंचायतमध्ये आणण्याचा कमलाकर रणदिवे यांचा आग्रह का ?

0
199
सिंधुदुर्गनगरी : दि.०३ : गुरुप्रसाद दळवी : अणाव ग्रामपंचायत ग्रामसेवकाची तात्काळ बदलीची मागणी ग्रामस्थ करत आहेत. हजर झाल्यापासून ग्रामपंचायतमध्ये उपस्थित नसल्याने शाळकरी मुले दाखल्यापासून वंचित राहत आहे. दोन-दोन चार्ज जर ग्रामसेवक स्वीकारत असतील तर त्याला उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे याला जबाबदार आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी ग्रामसेवक दया अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असा इशारा ग्रा. पं. सदस्य गजाजन कुलकर्णी यांनी दिला आहे. अणाव ग्रामपंचायतीला हाच ग्रामसेवक देण्यासाठी कमलाकर रणदिवे आग्रही का? असा सवाल सर्वसामान्य जनतेतुन होत आहे. आज चक्क एका ग्रामस्थांनी भेट दिली असता आपण रिपोर्ट बीडीओ यांच्याकडे देण्यासाठी गेलो असे सांगण्यात आले. अशा ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी अणाव ग्रामास्थातून होत आहे. या होणाऱ्या नुकसानीकडे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्‍मी लक्ष देणार काय? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here