चिखलफेकची घटना चुकीची असली तरी कणकवलीकरांची ही स्वाभाविक प्रतिक्रिया : एम.के.गावडे

0
304

वेंगुर्ले :  दि.०६ : हायवेच्या संदर्भात गुरुवारी कणकवलीत घडलेली चिखलफेकची घटना ही चुकीची असली तरी स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे मत एम के गावडे यांनी व्यक्त केले आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू असताना एक बाजू वाहतुकीसाठी योग्य बनवून देणे, हे ठेकेदार कंपनीचे काम आहे. सिंधुदुर्गातील हीच ठेकेदार कंपनी गोव्यामध्ये काम करीत आहे. त्यांनी त्याठिकाणी वाहतुकीचा रस्ता व्यवस्थित ठेवला आहे. मात्र सिंधुदुर्गात त्यांनी हि व्यवस्था कधीच केली नाही असेही यावेळी राष्ट्रवादिचे प्रांतिक सदस्य एम के गावडे यांनी सांगितले आहे.पाऊस सुरु होण्यापूर्वी एक बाजू तरी वाहतुकियोग्य करून देणे ठेकेदार कंपनीचे काम होते. लोकप्रतिनिधीनि वारंवार अधिकाऱ्यांना विनंती करूनही ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले व अधिकाऱ्यांनी आपले कुणी काही करू शकत नाही, या मानसिकतेने ठेकेदार कंपनीला पाठीशी घातले. हजारो नागरिक टू व्हीलर किंवा रिक्षाने या रस्त्याने प्रवास करतात. त्यांची होणारी कुचंबना संबंधित अधिकारी किंवा सरकारच्या लक्षात येत नाही. त्यामुळे लोकांच्या अडचणीशी संलग्न असलेल्या लोकप्रतिनिधीना आंदोलने करावी लागतात. सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी व दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. त्यामुळे आज कोणतीही सार्वजनिक यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत नाही. म्हणून आंदोलनात सह्भागीवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे, योग्य वाटत नाही. देशात अघोषित आणीबाणी सुरु आहे, त्याचे हे जिवंत उदाहरण आहे व हि गोष्ट लोकशाहीस घातक आहे,असे प्रतिपादन शनिवारी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here