मळेवाड ग्रामस्थांनी घातला वीज अधिकाऱ्यांना घेराव ; तात्काळ उपाययोजना करा, अन्यथा उग्र आंदोलन

0
131

सावंतवाडी : दि १५ : मळेवाड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत समस्या मांडल्या. यावेळी खराब झालेले खांब,तुटलेल्या तारा,लाईनमन व वायरमन यांना चांगली सेवा देण्यात बाबत योग्य सूचना देणे,ट्रान्सफॉर्मर बदलणे,उघडे असलेले फ्यूज बदलून ते बंदिस्त करणे,विद्युत वाहिन्यांवरील झाडे तोडणे अशा अनेक समस्यां मांडत यावर तात्काळ उपाययोजना करणे अशी मागणी करण्यात आली.तसेच अधिकारी फोन उचलत नाहीत,योग्य उत्तरे देत नाहीत त्यांना ग्रामस्थां बरोबर व ग्राहकांशी सलोख्याने वागण्या बाबत सूचना द्यावी अशीही मागणी करण्यात आली.वारंवार सूचना देऊनही ग्राहकांच्या समस्यांकडे डोळेझाक करणाऱ्या वीज अधिकाऱ्यांना आज मळेवाड येथील बैठकीत ग्राहकांनि धारेवर धरत समस्यांचा पाडा वाचला.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला.यावेळी सदरच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन वीज अधिकारी बसरकट्टी यांनी दिले.यावेळी जि सदस्य शर्वाणी गावकर,जि प सदस्य राजन मुळीक,उपसभापती संदीप नेमळेकर,संजय नाईक,बाबा कोरगावकर, शैलेश नाईक,सुधा कवठणकर आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here