सावंतवाडीत सिग्नल बसविण्याची युवकांची मागणी 

0
354

सावंतवाडी : दि २२ : सद्यस्थितीत सावंतवाडी शहरात दुचाकी, चार चाकी वाहनांचे प्रमाण वाढलय. त्यामुळे प्रवाशांना, वाहन चालकांना प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतय. शहराची विकासाच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरु आहे. त्यामुळे बिल्डींग, वाहनांची संख्या वाढलीय. त्याचप्रमाणे शहराची लोकसंख्या सुमारे लाख-दीड लाख आहे. सिग्नल नसल्यामुळे अपघाताच प्रमाणही वाढलय. एसपीके कॉलेज जवळ, एस टी.स्टॅण्ड, जयप्रकाश चौक, नगरपरिषद, चिटणीस चौक, गांधी चौक यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी सिग्नल बसविण अत्यावश्यक आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळून होणाऱ्या अपघातांना आळा  बसेल आणि वेगावरही नियंत्रण येईल. त्याचबरोबर नागरिकांची होणारी गैरसोय कमी होईल. यासंदर्भात सावंतवाडीतील युवकांनी  नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्याधिकारी, पोलीस ठाण्यात निवेदन दिल. युवकांच्या या संकल्पनेच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केल. यावेळी जास्मिन लक्ष्मेश्वर, ओंकार बर्वे, संदेश मुंज, निकिता आराबेकर, ऋषिकेश धुरी, ओंकार साटम, प्रेम चोडणकर, सिताराम धुरी, सुरज सैलानी, सोनाली राऊळ, नेहा परब, सुकन्या नाईक वैभवी हिरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here