कणकवली नगरपंचायतीत अशी ही बनवाबनवी स्पर्धा…!

0
321

कणकवली : दि. २६ : इंडियन ऑइल कंपनीच्या ९५ लाखांच्या सीएसआर फंडाच्या प्रकरणात कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधारी चांगलेच तोंडावर आपटले आहेत. आमदार नितेश राणे आणि नगरपंचायतीतील नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये फसव्या विकासकामांच्या जोरावर जनतेला उल्लू बनविण्याची स्पर्धा लागल्याची जहरी टीका सेनाभाजपच्या नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. इंडियन ऑइल कंपनीचा दमडीचाही सीएसआर फंड कणकवली नगरपंचायतला मंजूर नसताना आणि इंडियन ऑइल कंपनीच्या सीएसआर फंडाची कोणतीही शहानिशा न करता उतावीळपणे नगरपंचायतची विशेष सभा आयोजित करून विकासकामांची यादी जाहीर करणे नगराध्यक्ष नलावडे आणि सत्ताधारी नगरसेवकाना महागात पडले आहे. याप्रकरणात सत्ताधारी सपशेल तोंडावर आपटले असल्याची टीका विरोधी नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. अनधिकृत ३ मजली बांधकाम असलेली पोदार स्कुलची इमारत, ९०० कोटींचा ए जि डॉटर्स कचरा प्रकल्प, हायवेबाधितांना वाढीव मोबदला, मोफत औषध आपल्या दारी, भटके कुत्रे शेलटर , रिव्हर राफ्टिंग आदी फसव्या प्रकल्पातून आतापर्यंत कणकवली वासियांना ‘एप्रिल फुल्ल’ केले आहे़. मात्र आता नगराध्यक्षांनी यात भर घालत कणकवली नगरपंचायतीचा नव्हे तर कणकवलीवासीयांचा पोपट केला असल्याचा आरोप शिवसेना-भाजपा युतीचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह रूपेश नार्वेकर, कन्हैया पारकर यांनी केला़. खोटे बोला पण रेटून बोला, या प्रमाणे कणकवलीच्या नगराध्यक्षांचा कारभार सुरू असून इंडियन आॅईल कंपनीचा ९५ लाखांचा सीएसआर फंड आला नसतानाच विकासाच्या वल्गना करत कणकवली वासियांची दिशाभूल आणि फसवणुक केल्याप्रकरणी मुख्याधिकारी यांच्यासह नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व त्यांची टिम यांच्या विरोधात पालकमंत्र्यांकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले़. कणकवली शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना भाजपा युतीच्या नगरसेवकांची संयुक्त पत्रकार परिषदेवेळी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, माही परुळेकर, मेघा सावंत, सुमेधा अंधारी, मानसी मुंज यांच्यासह महेश सावंत, भूषण परुळेकर, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते. कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी १९ जुलै रोजी कणकवली नगरपंचायतीची बैठक लावत इंडियन आॅईल कंपनीकडून ९५ लाखांचा निधी प्राप्त होत असून यासाठी कामे सुचविण्याचे आवाहन केले होते़. नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा या प्रकरणी असलेला रूबाब पाहता आपणच निधी आणला या आवेषात नगराध्यक्ष बोलत होते, अशी टिका करताना कन्हैया पारकर म्हणाले खोटे बोला पण रेटून बोला या उक्तीप्रमाणे नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार सुरू आहे़. इंडियन आॅईल कंपनीकडून ४ जुलै रोजी मेल आला असेल तर बैठक लावण्यासाठी १९ तारीखपर्यंत वाट का पहावी लागली? असा सवाल करताना पारकर म्हणाले, वास्तविक ज्यावेळी एखादा सार्वजनिक कामांबाबतचा महत्वाचा विषय असतो, त्या बाबतचा अजेंडा काढावा लागतो़. प्रशासनाने कार्यालयीन टिप्पणी काढावी, ही त्यांची जबाबदारी असते़ आम्ही वारंवार कार्यालयीन टिप्पणीची मागणी केली़ मात्र सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला कार्यालयीन टिप्पणी दिलेली नाही़. इंडियन आॅईलच्या सीएसआर फंडाबाबतही असेच घडले असून केवळ कणकवली वासियांना फसविण्यासाठीच विकास कामांच्या वल्गना करण्यात आल्याचा टोला पारकर यांनी लगावला़ आमदार नितेश राणे यांनी आजपर्यंत कणकवली वासियांना एप्रिल फुल्ल केले आहे़ .ए़ जी़ डॉटर्स कंपनीचा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प, औषध आपल्या दारी, सीसीटीव्ही कॅमेरे, बोटींग प्रकल्प ही त्याची उदाहरणे असून आता पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून कणकवली वासियांना फसविण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप करताना कन्हैया पारकर म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्या ५३ क्रमांकाच्या आरक्षणामध्ये पोतदार स्कूलच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे़ हे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी घेण्यात आलेली नाही़ . पदसिध्द अधिकारी भाई साटम यांनी बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली आहे़ असतानाही कणकवली वासियांची दिशाभूल करत दुमजली इमारत उभी राहीली असून कारवाई करताना केवळ शेडच दाखविल्याचा पोलखोल कन्हैया पारकर यांनी केला. पोतदार सारख्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून कणकवली वासियांची फसवणूक करण्याच्या या प्रकराबाबत माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती घेतली असून नगराध्यक्ष आणि आमदार यांची ही फसवण्याची स्पर्धा असल्याचे त्यांनी सांगितले़. ए़ जी़ डॉटर्स कंपनीचा करार झाला असेल तर निवीदा का काढता? असा सवाल करत मुळात हा करार तरी रद्द करा अन्यथा प्रकल्प घालवा, असे पारकर म्हणाले.इंडियन आॅईल कंपनीचे नाव सांगत एखादा भामटा येऊन नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांची फसवणूक करतो, यावरून नगरपंचायत नव्हे तर सत्ताधारीच पोपट झाले असल्याचा टोला लगावतानाच नगरसेवक सुशांत नाईक म्हणाले, काही दिवसांपूर्वी हेच सत्ताधारी काही लोकांना पोपट म्हणून हिणवत होते़. मात्र आता नियतीनेच यांना पोपट बनविले आहे़ निदान आतातरी आमदार व नगराध्यक्ष यांनी एप्रिलफुल्ल करण्याचे प्रकार थांबवावेत़.गेली पाच वर्षे जनतेला फसवूण दिशाभूल करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत़ हा प्रकार आता जनतेच्या लक्षात आला असून निदान आतातरी हे प्रकार थांबवा, असेही सुशांत नाईक म्हणाले़. लग्नाची तयारी झाली, नवरा नटला, नवरी नटली, वºहाडी आले मात्र एैन लग्नाच्या मुहुर्तावरच नवरी गायब अशातला प्रकार कणकवली नगरपंचायतीच्या सत्ताधाºयांनी या सीएसआर फंडबाबत केला असल्याचा टोला यावेळी नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी यावेळी लगावला़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here