शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विविध उपक्रम

0
139

वैभववाडी : दि २६ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी दत्तमंदिर येथे सकाळी ११ वा अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच खांबाळे केंद्रशाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तालुक्यात अन्य विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे अस आवाहन शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here