आ. वैभव नाईक पुन्हा आमदार होण्यासाठी माणगांव खोऱ्यातून मोठ मताधिक्य देणार ; शिवसैनिकांचा निर्धार

0
98

कुडाळ : दि २७ : माणगांव तिठा येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून या कार्यालयाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. माणगांव खोऱ्यात आ. वैभव नाईक यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत.त्याची पोचपावती म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक हे पुन्हा आमदार होण्यासाठी माणगांव खोऱ्यातून जास्तीत मताधिक्य देण्याचा निश्चय शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रसंगी उपसरपंच एकनाथ केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, माणगाव खोऱयातील लोकांच्या समस्या ,अडचणी सोविण्यासाठी या संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना विकास कामे जनतेपर्यत पोचविल्या जाणार आहेत. शासकीय योजनांचा प्रत्येक व्यक्तीला लाभ देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महिला संपर्क प्रमुख सुचिता चिंदरकर, जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी जि. प. सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, पं. स सदस्य शरयू घाडी, माजी पं स. सदस्य संतोष कुंभार, घावनळे विभागप्रमुख रामा धुरी, माणगाव विभाग प्रमुख बबन बोभाटे, बंड्या कुडतरकर, रमाकांत धुरी, झाराप सरपंच स्वाती तेंडोलकर, वाडोस उपसरपंच कृष्णा धुरी, प्रशांत म्हाडगूत, बाबू परब, एकनाथ परब, सतीश पडते, बाळा जोशी, युवासेना विभाग प्रमुख आप्पा मुंज, गुरु माणगावकर, संजय धुरी, श्री लाड, योगेश धुरी आदी शिवसेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here