शैक्षणिक उन्नतीसाठी शिवसेना सदैव राहणार पाठीशी : माजी सभापती रमेश तावडे

0
133

वैभववाडी : दि २७ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिकून मोठे झाले पाहिजे. शैक्षणिक उन्नतीसाठी शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास माजी सभापती रमेश तावडे यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे केंद्रशाळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व मंगेश लोके मित्रमंडळ यांच्यावतीने खांबाळे केंद्रशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच दहावी बारावी परीक्षेत उतीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थीचा सत्कारही करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जि. प. सदस्या दिव्या पाचकूडे, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, दीपक पाचकूडे, खांबाळे माजी सरपंच विठोबा सुतार, पांडुरंग गुरव, माजी पोलीस पाटील अमृत कांबळे, प्रवीण गायकवाड , प्रमोद लोके, युवासैनिक दत्तात्रय परब, खांबाळे टेम्बवाडी शाखाप्रमुख वैभव पवार, ग्रामसेवक कोकणे, उपशाखा प्रमुख सत्यवान सुतार आदी उपस्थित होते.रमेश तावडे म्हणाले की, शिवसेना ही कोणत्याही निवडणूकीसाठी कार्यक्रम राबवत नाही तर शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणानुसारच काम करत राहते. शिवसेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे तालुका मध्ये असे अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गेली १५ वर्ष सातत्याने शिवसेनेच्या वतीने या गावचे सुपुत्र व पंचायत समिती सदस्य श्री मंगेश लोके हे शालेय तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विध्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करून विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आले आहेत. त्यांनी राबलेल्या या उपक्रमाचा आपण विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दृष्टया आपल्या भावी वाटचाली साठी उपयोग करून घ्यावा व आपण आपल्या गावचे व शाळेचे नाव उज्वल करुण आपली शैक्षणिक उन्नती साधावी असे आवाहन तावडे यांनी केले. मान्यवराच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या, छत्री, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ व महिला, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here