सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या पंच मंडळाच्या सभेत अनेक निर्णय…!

0
113

कुडाळ : दि. ३१ : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या पंच मंडळाची सभा नुकतीच पिंगुळी, कुडाळ येथे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह दिनेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत अनेक निर्णय घेण्यात आले. सदर सभेस जिल्हा पंचमंडळ सदस्य नितिन हडकर, प्रीतम वालावलकर, प्रथमेश सावंत, दाजी रेडकर राज्य पंच किशोर पाताडे, सागर पांगुळ, राजेश सिंगनाथ, शिवदास मस्के, मंदार ओरसकर, रेनॉल्ड बुतेलो आदी मान्यवर उपस्थित होते. दिनांक १० व ११ ऑगस्ट रोजी मालवण येथे होणाऱ्या वार्षिक राज्य पंच शिबिराच्या अनुषंगाने सदर जिल्हा पंच मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे राज्य पंच शिबिरास जिल्हा पंच मंडळाकडून लागणाऱ्या सहकार्याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले. यावेळी आयोजन समिती सदस्य नितिन हडकर यांनी राज्य पंच शिबिराच्या तयारी बाबतचा आढावा दिला. राज्यातून येणाऱ्या राज्य राष्ट्रीय पंचांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करायचे ठरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत पंचाना या राज्यस्तरीय पंच शिबिराचा लाभ घेता यावा याबाबत चर्चा करण्यात आली व त्याकरिता प्रत्येक तालुक्यातील जिल्हा पंच मंडळ सदस्या कडे जबाबदारी सोपविण्यात आली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे नवनिर्वाचित सरकार्यवाह माननीय आस्वाद पाटील आणि राज्य पंच मंडळ अध्यक्ष व सिंधुदुर्गचे सुपुत्र रमेश हरियाण यांचा विशेष सत्कार सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने केला जाणार असल्याचे याप्रसंगी कार्यवाह दिनेश चव्हाण यानी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत पंचांना पंच गणवेशाकरिता आवश्यक टी-शर्ट मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने याप्रसंगी प्रदान केले जाणार असल्याचेही चव्हाण यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here