मुलांनी ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा : अर्चना घारे-परब

0
89

सावंतवाडी : दि ३१ : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक परितोषिक वितरण समारंभ आणि पुरस्कार वितरण संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी  ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांनी नाराज होऊ नये. तसेच त्यांनी यावेळी शाळेसाठी सहकार्य करणार्‍या पालक यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अर्चना घारे- परब यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “मुलांनी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा. इतर मुले जातात म्हणून त्यांच्या मागे जाऊ नये. त्यामुळे आवड नसलेल्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. तुमची आवडती शाखा निवडल्यास त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळ खेळावे त्यामुळे आपली शारीरिक वाढ होऊन आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.कै.ज.भा.पेंढारकर पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मनोहर परब म्हणाले, “नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था ही एक जिल्ह्यातील आदर्श संस्था आहे. या विद्यालयाचा शैक्षणक दर्जा उंचावलेला आहे. या कै ज. भा. पेंढारकर आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाल्यामुळे मी स्वत:ल धन्य समजतो. ज्या ज्या शाळेत मी अध्ययन केले त्या मुलांमुळे मला ओळख मिळाली. मुलेच आपल्याला असे आनंदाचे क्षण मिळवून देतात” असे मनोहर परब म्हणाले. कै. प्रमिला शिवराम जाधव आदर्शं शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रतीक्षा तावडे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, “अशाच पुरस्कारातून प्रत्येक व्यक्तिला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. यावेळी संस्थेचे सचिव स.पा.आळवे, कार्यकारी अधिकारी श्रीराम झारपकर, मुख्याध्यापक व्ही. ए. वेटे, डॉ.हेमंतकुमार सावंत, नारायण सांगळे, विठ्ठल कदम, तुकाराम गुडेकर, विनायक परब उपस्थित होते. अहवाल वाचन राजेश गुडेकर यांनी केले. सूत्रसंचालन वैभव खानोलाकर यांनी केले तर आभार नितिन धामापूरकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here