महिला बचतगटांसाठी हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची स्पर्धा

0
104

सिंधुदुर्गनगरी : दि. ०१ : महिला बटतगटांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे, तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर मंच उपलब्ध करुन देणे व उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी अर्थसहाय्य करणे या उद्देशाने हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. सदर स्पर्धेचा पहिला पट्टा पूर्ण झाला असून तालुका स्तरीय सादरीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. दिनांक २ ऑगस्ट रोजी महालक्ष्मी सभागृह, कुडाळ, दिनांक ३ ऑगस्ट रोजी साईमंगल कार्यालय, वेंगुर्ला, दिनांक ७ ऑगस्ट रोजी देवज्ञ भवन सभागृह, मालवण व नवसरणी सभागृह सावंतवाडी या प्रमाणे सादरीकरण होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला बचत गटांनी या स्पर्धेत सहभागी होऊन नवसंकल्पना सादर करुन यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करावे असे आवाहन सु.श.पवार सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here