महसूल यंत्रणेने अधिक सक्षम न्यायोचित निर्णय होणे अपेक्षित : जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे

0
25
????????????????????????????????????

सिंधुदुर्गनगरी : दि. ०२ : दरवर्षी त्याच मागण्या तेच प्रश्न घेऊन न्याय हक्कासाठी निदान तरी न्यायोचित निर्णय होणे यंत्रणेशी संबंधित सर्व घटकांकडून अपेक्षित आहे असे प्रतिपादन महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.  महसूल दिनानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणाऱ्या या यंत्रणेतील कार्यरत अधिकाऱ्यांचा कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) रोहिणी रजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड, उपविभागीय अधिकारी कुडाळ डॉ. विकास सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी श्री. सुशांत खांडेकर आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती राजश्री सावंत व श्रीमती शिल्पा तेरसे यांनी केले. यावेळी महसूल विभागातील जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपीक, तलाठी,  कोतवाल पोलीस पाटील व शिपाई संवर्गातील एकूण 41 अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here