खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वयंसेवकांद्वारे वृक्षारोपण

0
115

कणकवली : दि २ :  खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कणकवली तालुक्यातील शिडवणे येथे वृक्षारोपण तसेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. अशा या नावीन्यपूर्ण उपक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ३० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.शिडवणे गावात ठिकठिकाणी काजु, गुलमोहर, सागवान, चिंच आणि शिवन असे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षारोपण जनजागृती निमित्त वृक्ष म्हणजे – जीवन, वृक्षारोपण – पर्यावरण संरक्षण, वृक्ष सारखा परम पवित्र – नसे दुजा मित्र, जीवनासाठी प्राणवायू – प्राणवायूसाठी वृक्ष, एक व्यक्ती – एक झाड अशा घोषनांच्या गजरात जनजागृतीरॅलीचे आयोजन असे उपक्रम राबविण्यात आले.आज आपण आरोग्य व स्वास्थ्यदायी जीवन जगतोय त्याचे मुळ महणजे वृक्ष असून पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्षांचे स्थान अनन्यसाधारण महत्वाचे आहे.वर्तमान व भविष्याचे संरक्षण करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. याची प्रचिती राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वयंसेवकांनी वृक्षारोपण या कृतीतून दिली.वृक्षांची लागवड केली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नसून लागवड करण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची निगा राखणे, ही जबाबदारी अत्याधिक महत्वाची आहे. असा संदेश राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वयंसेवकांनी जनजागृती रॅली द्वारे दिला.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटणचे संचालक रघुनाथ राणे, सुधीर कुबल, उमेश ढेकणे शिडवणे ग्राम पंचायत कर्मचारी उमेश मेस्त्री, शिडवणे शाळा नं. 01 चे मुख्याध्यापक सुनिल तांबे व सहाय्यक शिक्षक प्रविण कुबल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग जिल्हा समन्वयक तथा खारेपाटण महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.वसीम सय्यद आदी उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी प्रतिनिधी दशरथ इंगळे, प्रणाली पांचाळ, प्रथमेश नारकर,  दिक्षीता बांदीवडेकर, कुणाल हरयान, स्मिता भालेकर,  स्वप्निल मांडवकर, भुषण पाकले,  प्रथमेश राणे,  शैलेश खाड्ये, सायली शिंदे, अभिजीत कानडे, मयूर बेंद्रे, शुभम भितम, चेतन राऊत, ओंकार गोसावी, वैष्णवी राऊत,  योगिता सोरप, मयुरी शेट्ये, ज्योती पांचाळ,  ओंकार कानडे, सोनल पवार, श्वेता हर्याण,  आकाश कोकाटे,  मिलन ठोसर,  सायली पवार, फाईजा खान, रसिका फाटक, श्वेता मोरे,  प्रतिक गुरव, अनिकेत पाष्टे, अशिष कोकाटे,  प्रथमेश शिरावडेकर,  राम माईंकर, सिध्देश खाड्ये अशा या राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वयंसेवकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here