पूर्वीची शिवसेना त्याच ताकतीने उभी करेन…!

0
150

वेंगुर्ला : दि. ०४ : शिवसेनेत काम करत असताना पदाच्या मागे धावू नका. काम करत रहा पद तुम्हाला आपोआप मिळेल. जिल्हापरिषदेत यापूर्वी कोणत्याच नेत्याने एवढा निधी आणला नाही जेवढा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आणला. जिल्ह्यात १९९५ सालात जी शिवसेना होती ती पुन्हा त्याच ताकतीने उभी करेन असे प्रतिपादन नूतन जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी वेंगुर्ला येथे कार्यकर्ता मेळाव्यात केले. तर शिवसेनेचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून पक्ष श्रेष्टींनी जी तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती मी सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पार पडून वेंगुर्ला तालुक्यात पक्ष संघटना अधिकच मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच तालुक्यातील प्रत्येक लहान मोठ्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः पक्षाचे नेतृत्व केले तरच पक्ष संघटना मजबूत होईल यासाठी एकसंघ पणे काम करूया से आवाहन तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी यावेळी केले. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, सभापती सुनील मोरजकर, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, सचिन देसाई, अजित सावंत, जिल्हापरिषद सदस्य नितीन शिरोडकर, सुनील म्हापणकर, पंचायत समिती सदस्य अनुश्री कांबळी, प्रणाली बंगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुमन निकम, तुषार सापळे, संदेश निकम, उपतालुका प्रमुख संजय गावडे, शहर प्रमुख विवेक आरोलकर, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, शहर महिला संघटक मंजुषा आरोलकर, जिल्हा बँक संचालक राजन गावडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील डुबळे, माजी सभापती सुचिता वजराटकर, अतुल बंगे, सुशील चिंदरकर आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here