राष्ट्रवादीच्या भव्य भजन स्पर्धा महाअंतिम फेरीचा निकाल जाहीर

0
169

सावंतवाडी : दि ४ : संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भजन स्पर्धेचेआयोजन करण्यात आले होते. रविवारी सावंतवाडीत बॅ.नाथ.पै. सभागृहात या भव्य भजन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस सुरुवात करण्यात आली होती. वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे झालेल्या प्राथमिक फेरीतून महाअंतिम फेरीसाठी १५ संघ निवडण्यात आले होते. या १५ ही संघाकडून बहारदार अभंग,भजनपद सादर करण्यात आली. यावेळी तिन्ही तालुक्यातील भजन रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सर्वत्रच मुसळधार पाऊस असताना देखील महाअंतिम फेरीला मिळालेला प्रतिसाद, भक्तीरसात तल्लीन झालेल्या युवावर्गाला पाहून खूप आनंद झाला असे प्रतिपादन अर्चना घारे-परब यांनी केले. या स्पर्धेत महिला संघानी घेतलेला सहभाग देखील कौतुकास्पद होता. महाअंतिमफेरीच्या बक्षीस वितरण समारंभावेळी त्या बोलत होत्या. अर्चना घारे-परब यांच तिन्ही तालुक्यात चालू असलेलं कार्य स्तुत्य स्वरूपाचं आहे. ही देव पाटेकराची ही वास्तू असल्याने परमेश्वराच्या मनात काय आहे हे आगामी काळात दिसेलचं असं सुचक विधान माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्चना घारे-परब करत असलेल कार्य उल्लेखनीय आहे. सावंतवाडीच्या सुकन्येने सरपंच ते महाराष्ट्रातील एक नंबरच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये उपाध्यक्षपदापर्य॔त मारलेली मजल सावंतवाडीसाठी अभिमानास्पद आहे असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी केले. या भव्य भजन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ वडखोळ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरल. तर श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ, सांगेली द्वितीय, जैतीराश्रीत प्रासादिक भजन मंडळ, तुळस तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ, वडखोळ, उत्तेजनार्थ द्वितीय श्री सातेरी प्रासादिक भजन मंडळ, माटणे, उत्कृष्ट गायक रूपेंद्र परब, उत्कृष्ट कोरस श्री जैतीराश्रीत भजन मंडळ, तुळस, उत्कृष्ट झांज वादक बाळकृष्ण परब, उत्कृष्ट पखवाज वादक भावेश राणे, उत्कृष्ट हार्मोनियम वादक बक्षिस समीर नाईक यांनी प्राप्त केल. परिक्षक म्हणुन भाई शेवडे, मोहन मेस्त्री, शहाजहान शेख यांनी काम पाहिले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा निरीक्षक तथा अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, अॅड. दिगंबर गावकर,वर्षा गावकर, अशोक पवार, प्रेमानंद देसाई, मकरंद परब, सुनिल परब, प्रविण परब, संदीप राणे, गुरूवर्य निलेश मेस्त्री, संदीप घारे, राष्ट्रवादी व्यापारी संघाचे जिल्हा अध्यक्ष पुंडलिक दळवी, विनायक परब, संजय कात्रे, कृष्णा राऊळ, किशोर सावंत, वैभव केंकरे, सोमा सावंत, पुजा दळवी, निरज मिलिंद भोसले, सिध्दी परब,रामदास गवस, सर्वैश राऊळ, केतकी सावंत, अबरार शेख, ओकार शिंगोटे, गणेश कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here