जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं विधेयक लोकसभेत मंजूर

0
75

नवी दिल्ली : दि ६ : जम्मू काश्मीरच्या विभाजनाचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलंय. यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूनं 367 तर विरोधात 67 मतं पडली. दरम्यान, मतदानानंतर लगेचच काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून या निर्णयाचं समर्थन केलंय. त्यामुळं या विधेयकावरून काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. तांत्रिक कारणांमुळ दोनदा हे मतदान घेण्यात आलं. त्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात सविस्तर निवेदन केलं. विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here