परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा देणाऱ्या कुशल नेत्या हरपल्या…!

0
78

नवी दिल्ली : दि. ०७ : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (६७) यांचे मंगळ‌वारी रात्री निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मंगळवारी रात्री १०.२० च्या सुमारास त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना थेट आपत्कालीन विभागात नेण्यात आले. पाच डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र त्यांचे निधन झाले. एम्समध्ये दाखल करण्याच्या सुमारे तीन तास आधी सुषमा यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. टि्वटरवर सक्रिय राहणाऱ्या सुषमा यांनी सायंकाळी ७.२३ वाजता टि्वट केले होते की, पंतप्रधानजी, तुमचे हार्दिक अभिनंदन. मी माझ्या जीवनात या दिवसाचीच प्रतीक्षा करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रात्री उशिरा एम्समध्ये आले होते. वर्षभरापूर्वीच एम्समध्ये त्यांच्या किडनीचे प्रत्यारोपण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here