राष्ट्रीय थाई बाँक्सींगस्पर्धेत वैभववाडीच्या सुपुत्राला कास्य पदक

0
62

वैभववाडी : दि ७ : हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील करुळ गावचा सुपूत्र आर्यन विजय कोलते या युवा खेळाडूने कास्यं पदक पटकावले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. थाई बाँक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर आर्यन याने उज्वल यश संपादन केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी त्याचे अभिनंदन केले. आर्यन सध्या पेस आयआयटी कॉलेज ठाणे येथे अकरावी इयत्तेत शिकत आहे. थाई बॉक्सिंग असोसिएशन जिल्हा ठाणे यांच्या वतीने जूनमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत आर्यन याने सुवर्ण पदकाची कमाई केली. नुकतीच लातूर येथे राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जवळपास 450 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशन (MTA) यांच्या मार्फत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आर्यन याने सिल्वर मेडल पटाकावले होते. आपली घौडदौड कायम राखली. नुकतीच हैदराबाद येथे थाई बॉक्सिंग इंडियन फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. आर्यन ने या स्पर्धेत कास्यं पदक पटकावत दबदबा कायम राखला आहे. आर्यन याला प्रशिक्षक बाळा साठे (ठाणे) यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here