बापर्डे रेडेटाका मार्गावर कोसळलेली दरड तात्काळ हटवा

0
236

देवगड : दि ७ : देवगड तालुक्यातील गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रजिमा 12 बापर्डे रेडेटाका ते तरळा या मार्गावर दरड कोसळून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे .या मार्गावरून विजयदुर्ग आगराच्या एसटी तसेच इतर वाहनांची वाहतूक करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.तसेच याच ठिकाणी आणखी मोठया दरडी कोसळण्याच्या स्थितीत आहे. जर या ठिकाणी पुन्हा दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्यास याला आपण सर्वस्वी जबाबदार असणार आहात. कारण आपल्या कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधला असता आपल्या कार्यालयाकडून दोन दिवसात येतो असा संदेश मिळतो.परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणीही आलेले नसते या मार्गाच्या खालच्या बाजूला लोकवस्ती असल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे तरी सदर मार्गावरील दरड हटविण्याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा आम्हाला वरिष्ठ कार्यालयाशी तसेच येथील स्थानिक आमदाराची संपर्क करावा लागेल. अशा आशयाचे निवेदन देवगड सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी श्री अंपळकर यांना बापर्डे सरपंच संजय लाड यांनी दिले. यावेळी श्रीकांत नाईकधुरे संजय नाईकधुरे विश्वास नाईकधुरे संतोष नाईकधुरे आदी उपस्थित होते. सदर दरड हटविण्याच्या कामास आमच्या विभागाकडून आज दुपार पासून सुरुवात करण्यात आलेली आहे असे श्री अंपळकर यांनी यावेळी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here