तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे नभरल्याने संजय देसाई यांचे उपोषण…!

0
68

दोडामार्ग : तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपआरोग्य आरोग्य केंद्रामध्ये एकूण ९ पदे रिक्त आहेत. वारंवार मागणी करूनही रिक्त पदे भरली गेली नसल्याने दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजी ग्रामस्थां समवेत तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कोलझर गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई यांनी दिला आहे. कोलझर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी ओरस यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रांतर्गत झोळंबे, कुडासे, कोलझर, कुंभवडे, फुकेरी, विलवडे अशी सहा उपआरोग्य केंद्र आहे. असं असताना या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक (हिवताप) उपकेंद्र कोलझर एक पद रिक्त, आरोग्यसेविका मुख्यालय व उपकेंद्र कुडासे कोलझर झोळंबे ४ पद रिक्त, आरोग्य सहाय्यीका ४ पद रिक्त ३०/४/२०१७ पासून १ पद रिक्त, परिचर दिनांक ३१/५/२०१८ पासून १ पद रिक्त, स्त्री परिचर सन २०१५ पासून १ पद रिक्त, सफाईगार १ पद रिक्त अशी एकूण ९ पद रिक्त आहेत. तळकट आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारी बरीचशी गावे ही अतिदुर्गम व डोंगराळ आहेत. पावसाळ्यात अनेक आजार बळावतात त्यातच या भागात माकड तापासारखी साथ आहे.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार चिपळूणकर यांच्या अथक प्रयत्नानंतर ही साथ आटोक्यात आणली, त्या साथीचे लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याने या आरोग्य केंद्रात बरीचशी पदे रिक्त असल्याने अनेक अडचणींना सध्या कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जावे लागणार आहे. ही रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी यासंदर्भात वारंवार संबंधित अधिकारी यांच्याकडे याभागातील ग्रामस्थांनी केली मात्र ती पदे अद्याप पर्यंत भरली गेली नाही.प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराला कंटाळून या भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच असलेल्या या मागणीसाठी याभागातील ग्रामस्थांसमवेत तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजीक कार्यकर्ते संजय देसाई यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here