दोडामार्ग ते बांदा रस्त्यावरील खचलेला भाग दुरुस्त करा ; सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बांधकामला धडक

0
45

दोडामार्ग :  दोडामार्ग ते बांदा मुख्यमार्गावर मणेरी दरम्यान रस्त्या एका बाजूने खचला आहे.या मार्गावरून मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते असंख्य वाहने या मार्गावरून ये-जा करत असतात त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.  नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे हा रस्ता एकाबाजूने खचला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना धोकादायक असल्याने याठिकाणी बॅरेकेट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दिवसा वाहनाधाराकाना धोका लक्षात येऊ शकतो मात्र रात्रीच्या वेळी या मार्गावरून सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील बरेच तरुण गोव्याला आपल्या दुचाकीवरून कामाला जातात तसेच खाजगी वाहनांची पण मोठया प्रमाणात रहदारी असते.त्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी शिवसेनेचे तालुका संघटक संजय गवस, विभाग प्रमुख लक्ष्मण आयनोडकर, मिलिंद नाईक यांनी पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाला धडक खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करून दया अशी मागणी करत खचलेल्या रस्त्या संधार्भात विचारणा केली असता त्याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे सांगत आपला कर्मचारी पाठवून तात्काळ त्याठिकाणी उपाययोजना करू असल्याचे बांधकामचे कर्मचाऱ्यानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here