महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या धरणे आंदोलनाला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट

0
103

सिंधुदुर्गनगरी : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पदाची निर्मिती करावी, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे लागू करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता बदल करून पदवीधर ग्रामसेवक होण्याबाबत निर्णय घेण्यात यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सिंधुदुर्गच्यावतीने येथील जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सिंधुदुर्ग च्या आजच्या धरणे आंदोलनाला जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भेट देत त्यांच्या मागण्यांबाबत माहिती घेतली. या भेटी प्रसंगी बोलताना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे म्हणाले कि ग्रामसेवक हा ग्राम प्रशासनातील ग्रामस्थरावरील महत्वाचा घटक आहे, ग्रामसेवकांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार केला जातो व विविध योजनांचे शासनाला आवश्यक असलेले उद्दिष्ट ग्रामसेवक मुळेच पार पडले जाते, आज काही ग्रामपंचायतींमध्ये कायमचा ग्रामसेवक नसल्याची खुप उदाहरणे आहेत, एका एका ग्रामसेवकावर दोन दोन ग्रामपंचायती सांभाळण्याची वेळ आली त्यामुळे संबधित पदे भरण्यात यावीत,ग्रामसेवकाची अहर्ता पदवीधर करण्यात यावी या आणि इतर आपल्या मागण्या रास्त असुन आपल्या ग्रामसेवक युनियन च्या पाठिशी जिल्हा काँग्रेस पदाधिकारी कायम राहणार असून यापुढे ही ग्रामसेवकांच्या प्रश्नासाठी जिल्हा काँग्रेस आपल्या सोबत राहिल असे सांगितले. यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, डाॅ. जयेंद्र परुळेकर, प्रांतिक सदस्य इरशाद शेख, ओबीसी जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा प्रांतिक सदस्य काका कुडाळकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सर्फराज नाईक, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष दादा परब, कुडाळ तालुका अध्यक्ष आबा मुंज, विजय प्रभू, सावंतवाडी तालुका अध्यक्ष बाब्या म्हापसेकर, दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाळा धाऊसकर, प्रांतिक सदस्य बाळा गावडे, वेंगुर्ला नगरसेवक प्रकाश डिचोलकर, विधाता सावंत, आत्माराम सोकटे, नगरसेविका कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, सावंतवाडी युवक अध्यक्ष महेन्द्र सांगेलकर, राघवेंद्र नार्वेकर, चंद्रकांत राणे आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here