कोकणचं माळीण, तिवरे होऊ देऊ नका : अर्चना घारे-परब 

0
159
सिंधुदुर्गनगरी : दि १३ : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी, व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान झाल. पूरग्रस्तांना मदत मिळावी. अनेक दिवस आंबोली घाट रस्ता बंद असल्याने जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. यामुळे व्यापारी त्रस्त आहेत. त्यामुळे आंबोलीतील वाहतूक सुरळीत सुरू व्हावी, घाटमार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. कोकणच माळीण, तिवरे होणार नाही याची काळजी घ्यावी अशा विविध मागण्या अर्चना घारे-परब यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन केल्या.  तर एकेरी मार्ग येत्या चार दिवसात सुरू करणार अस आश्वासन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिल. यावेळी संदीप राणे, पुंडलिक दळवी, विनायक परब, संतोष तळवणेकर, शैलेश मयेकर, उल्हास नाईक,आर.के.सावंत, चित्रा देसाई, सिद्धेश परब, निकिता परब आदि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here