मयत कर्मचार्‍याच्या पत्नीला अनुकंपातत्वावर शिपाई पद ; बेमूदत धरणे मागे

0
189

सावंतवाडी : दि १३ : कलंबिस्त ग्रा.पं.च्या मयत कर्मचार्‍याच्या पत्नीला अनुकंपतत्वावर शिपाई पदावर सेवेत घेण्याचा निर्णय कंलबिस्त ग्रा.पं.च्या आजच्या मासिक सभेत घेण्यात आला. त्यापुर्वी ग्रा.पं.कर्मचारी संघटना व ग्रा.पं.प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. कामावर हजर करुन घेणार असल्याच लेखी पत्र संघटनेस कंलबिस्त सरपंच शरद नाईक यानी दिले. त्यामूळे १५ आॅगस्ट २०१९ ला पंचायत समिती सावंतवाङी यांचे समोरील बेमूदत धरणे आंदोलन मागे घेतले असल्याचे तालुकाध्यक्ष गुरुनाथ घाङी यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष हरीश्चंद्र आसयेकर,सदस्य, सचिन पारधी कृष्णा सावंत, सुंदर सावळ संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here