अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवा विझवण्यासाठी सरसावला कोकणी माणूस…!

0
7198

ब्राझील : अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनातील वणव्यांसंदर्भात जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन अपुरे पडत असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींने केला आहे. तर दुसरीकडे ब्राझीलने परदेशातून ही आग विझवण्यासाठी देण्यात येणारी मदतही नाकारली आहे. अशातच आता एका कोकणी माणसाने ब्राझीलच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी कंबर कसली आहे. हा कोकणी माणूस म्हणजे आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर. अॅमेझॉनच्या जंगलांना लागलेले वणवे विझवण्यासंदर्भात ब्राझील ठोस पावले उचलत नसल्यास आयर्लंड युरोपीयन राष्ट्र तसेच मर्कोसुर संघातील देशांबरोबरचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यास तयार आहे, असं वराडकर यांनी जाहीर केलं आहे. वराडकर यांनी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून जारी केलेल्या पत्रकामध्ये मर्कोसुर देशांबरोबरचा करार दोन वर्षांमध्ये संपुष्टात येणार असल्याचे नमूद केले आहे. ब्राझील अॅमेझॉनचे जंगल आणि पर्यावरण वाचवण्यासाठी काय पावले उचलतो यावर आयर्लंडकडून हा करार कायम ठेवायचा की नाही याबद्दल निर्णय घेतला जाईल असा अशाच वराडकर यांनी दिला आहे. मर्कोसुर देशांच्या संघटनेमध्ये अर्जेंटिना, ब्राझील, पराग्वे, उराग्वे आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश होतो. आयर्लंडने या देशांबरोबर व्यापार बंद केल्यास या देशांमधून आयर्लंडमध्ये निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंना मिळणारी बाजारपेठ बंद होईल. ‘आयर्लंड आणि इतर देशांमध्ये जेव्हा करार झाला होता त्यावेळी आयर्लंड आणि करार होणाऱ्या देशांकडून पर्यावर, कामागार आणि उत्पादनाच्या दर्जावर परिणाम होणार नाही अशी हमी देण्यात आली होती,’ अशी आठवण वराडकर यांनी या पत्रकामधून करुन दिली आहे. दरम्यान अॅमेझॉनमधील जंगलांमध्ये जागोजागी लागलेल्या वणव्यासाठी स्थानिक जबाबदार असल्याचे आरोप पर्यावरण प्रेमी आणि संशोधकांनी केले आहे. गुरांना चरण्यासाठी तसेच शेतीसाठी जमीन मोकळी करण्याच्या उद्देशाने स्थानिकांनी हे जंगल जाळल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here