ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ करण्याचा निर्णय

0
103

मुंबई : दि.२८ : राज्यातील मान्यवर ज्येष्ठ (वृद्ध), साहित्यिक कलावंतांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आजच्या या निर्णयानुसार सन्मानार्थी कलावंतांचे मानधन दीड पटीने वाढणार असून त्याचा लाभ राज्यातील २६ हजार मान्यवरांना होणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातील सन्मानार्थींसाठी ६० इतक्या इष्टांकाची मर्यादा १०० पर्यंत वाढविण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या अ वर्गातील कलावंतांना २१०० रुपये, ब वर्गातील कलावंतांना १८०० तर क वर्गातील कलावंतांना १५०० याप्रमाणे दरमहा मानधन दिले जात होते. यात दीड पटीने वाढ केल्याने हे मानधन अ वर्गासाठी ३१५०, ब वर्गासाठी २७०० तर क वर्गासाठी २२५० याप्रमाणे मिळणार आहे. या निर्णयाचा २६ हजार साहित्यिक-कलावंतांना लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here