जिओ गिगाफायबर – मोफत टीव्ही, प्लॅन आणि ऑफर…, जाणून घ्या, काय आहे खास

0
1317

मुंबई : दि.०६ : लायन्स जिओ होम ब्रॉडबँड सर्व्हिस गिगाफायबर (Gigafiber) गुरुवारी लाँच करण्यात आली.जिओच्याया गिगाफायबरचे रेंटल प्लॅन हे ६९९ रुपयांपासून ८,४९९ रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०० Mbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तर ८,४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ Gbps पर्यंत इंटरनेटचा स्पीड मिळणार आहे. गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे ३,९९९ रुपये आहे. यापुढील डायमंड प्लॅन आहे, त्याचे मासिक मासिक भाडे २४९९ रुपये आहे. तर प्लॅटिनम प्लॅनचे मासिक भाडे ३९९९  रुपये आहे. तर सर्वाधिक महागडा प्लॅन टायटॅनिअम असून याचे मासिक भाडे ८९९९  रुपये आहे. या सर्व गोल्ड ते टायटॅनिअम प्लॅनमध्ये ग्राहकाला ४K टीव्ही मोफत मिळणार आहे. रिलायन्सजिओचा सुरुवातीचा प्लॅन Bronze आहे. यामध्ये ग्राहकाला १०० mbps पर्यंत इंटरनेट मिळणार आहे. अनलिमिटेड डेटा (१००GB+५०GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. यामध्ये फ्री व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना फायदा होणार आहे. म्हणजेच, ग्राहक भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात. ८४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० mbps इंटरनेट स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (२००GB+२००GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. याशिवाय फ्री व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच, ग्राहकांना भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करता येणार आहे. जिओच्या १२९९ रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना २५० mbps स्पीडचे इंटरनेट मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (५००GB+२५०GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. याशिवाय, मोफत व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे.तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये ४K स्मार्ट टीव्ही मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या २४९९ रुपयांच्या डायमंड प्लॅनमध्ये ग्राहकांना ५०० mbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट डेटा (१२५० GB+२५०GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. यात ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा होणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये २४ इंचाचा एचडी टीव्ही मिळणार आहे. रिलायन्स जियोच्या ३९९९ रुपयांच्या प्लॅटिनम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना १ Gbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना अनलिमिडेट डेटा (२५००GB) मिळणार आहे. यात ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा होणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये ३२ इंचाचा एचडी टीव्ही मिळणार आहे. ८४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४३ इंचाचा टीव्ही रिलायन्स जियोच्या ८४९९ रुपयांचया प्लॅटिनम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना १ Gbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये ४३ इंचाचा ४K टीव्ही मिळणार आहे. यात टीव्हीची किंमत MRP ४४९९० रुपये आहे. तसेच, यामध्ये ग्राहकांना एक महिन्यासाठी ५००० GB डेटा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here