सिंधुदुर्ग राजाची उद्या निघणार भव्य विसर्जन मिरवणूक…!

0
210
सिंधुदुर्ग : दि. ११ : प्रतिवर्षीप्रमाणे अनंतचतुर्दशीला   उद्या गुरुवार १२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे. सकाळी १० वाजता महाआरती, १०.३० वाजता उत्तर पूजा व त्यानंतर सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. यावर्षी मिरवणूक कुडाळ एसटी स्टँड मार्गे, भंगसाळ नदी वरून पणदूर, ओरोस, सुकळवाड, कट्टा, चौके मालवण भरड नाका येथून मालवण समुद्र किनार्‍यावर पोहचणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्गाच्या राजाला निरोप देण्यात येणार आहे. सर्व सिंधुदुर्ग राजाच्या भक्तांनी १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात हजर रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here