अरविंद मेस्त्री यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार

0
170

सावंतवाडी : दि. ११ : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईड संस्थेचा सन २०१६-१७ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार अरविंद मधुकर मेस्त्री, कोलगाव माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव ता. सावंतवाडी यांना स्काऊट गाईड चळवळीतील सातत्यपूर्ण व प्रशंसनीय सेवेच्या गौरवार्थ हा पुरस्कार अॅड. आशिष शेलार, शालेय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते स्काऊट गाईड पॅव्हिलियन, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. अरविंद मधुकर मेस्त्री हे कोलगाव माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, कोलगाव , जि. सिंधुदुर्ग येथे सन १९९९ पासून आजपर्यंत स्काऊट मास्तर म्हणून कार्यरत आहेत. शालेय जीवनात इयत्ता आठवीपासून स्काऊट चळवळीमध्ये आहेत. सन २००६ मध्ये हिमालय वुड बॅज प्रशिक्षण पूर्ण करून पार्चमेट व बीडस् प्राप्त केले. ०४ स्काऊटस्ना राज्यपुरस्काराकरिता मार्गदर्शन केले. समुदाय विकास कार्यक्रम अंतर्गत, स्वच्छता उपक्रम, वनराई बंधारा, खरी कमाई, वृक्षारोपण, ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून विलेवाट, एड्स जनजागृती मोहिम, प्रश्न मंजुषा स्पर्धा, चिंतन दिन, पर्यावरण संवर्धन, निसर्ग निवास शिबीर, विशेष दिनाचे आयोजन, पल्स पोलिओ, पर्यावरण संवर्धन, वर्षासहल इत्यादी कार्यक्रमांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. दरवर्षी जिल्हा मेळाव्यात सहभाग, सन २०१५ मधील कोकण विभागीय मेळावा रत्नागिरी येथे सहभाग, राष्ट्रीय जांबोरी दिल्ली २००७ मध्ये सहभाग, जिल्हा स्काऊटर ट्रेनिंग कौन्सिलर २०१२ पासून २०१३ पर्यंत, सन २०१० – ११ राज्य मंडळ जिल्हा स्काऊटर प्रतिनिधी , सन २०१४-१५ मध्ये जिल्हा स्काऊटर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here