बबन साळगावकर यांच्यावर अंनिसने गुन्हा दाखल करावा : संजय गावडे

0
423

वेंगुर्ला : दि.११ : सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच साळगावकर यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी वेंगुर्ला शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय गावडे यांनी केली आहे. नगराध्यक्षपदावरील व्यक्तीने असे वक्तव्य करणे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणे. या वक्तव्याने समाजात जादू टोण्याला पाठबळ दिल्यासारखे बालीश वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे याचा निषेध सर्वस्तरातून झाला पाहिजे, असे वक्तव्य करून राजकारणाची खालची पातळी गाठली गेली आहे. यामुळे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची वैचारिक पातळी घसरली असुन सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय गावडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here