मालवण तालुक्यात सर्वाधिक ८० मि.मी पाऊस

0
42

सिंधुदुर्गनगरी : दि. ११ :  जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून मालवण तालुक्यात सर्वाधिक ८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १ जून २०१९ ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४१११.९४ मि.मी पाऊस झाला आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ४० (४९२५), सावंतवाडी १४ (४५०७), वेंगुर्ला १३.४ (४१७२.५४), कुडाळ ०५ (३८९६), मालवण ८० (३२७५), कणकवली ०६ (४४७३), देवगड ०६ (२९७०), वैभववाडी १७ (४६७७) पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here