सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीसाठी सोडलेला ; मतदार संघावर कोणीही दावा करू शकत नाही : अमित सामंत

0
93

कुडाळ : दि ११ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा आहे, आणि राष्ट्रवादीसाठी राहणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगून सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहणार आणि जे त्यांच्याविरोधात राजकारण सुरू करण्यात आले आहे त्या प्रवृत्ती विरोधात यापुढे लढणार असे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता टोला लगावला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अमित सामंत यांची निवड करण्यात आली ही निवड झाल्यावर जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, जिल्हा प्रवक्ते सावळाराम अणावकर, जिल्हा सचिव भास्कर परब, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, सामाजिक न्यायचे प्रदेश चिटणीस चंद्रकांत पाताडे, सामाजिक न्याय सेलचे कार्याध्यक्ष सचिन पाटकर, माजी नगराध्यक्ष व महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा सरचिटणीस शिवाजी घोगळे, अल्पसंख्यांक सेलचे नझीर शेख, मालवण अध्यक्ष डॉ.साठे, सत्यवान साटेलकर,योगेश कुबल, ओगोस्टीन डिसोजा, हार्दिक शेकले, संग्राम सावंत, अशोक कांदे, विकास कनयाळकर, संतोष तळवणेकर उपस्थित होते.यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले की, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडलेला आहे आणि त्या मतदार संघावर कोणीही दावा करू शकत नाही त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असे सांगून सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राजकारणाच्या माध्यमातून जो त्रास दिला जात आहे तो त्रास यापुढे सहन केला जाणार नाही बबन साळगावकर यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहणार आमची लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही तर त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीविरुद्ध आहे असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला तसेच येत्या काळामध्ये पक्षवाढीसाठी जेवढे जुने कार्यकर्ते आहेत त्यांची एक मुठ बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. खारेपाटण ते दोडामार्ग पर्यंत असलेला कार्यकर्ता पुन्हा या पक्षाच्या प्रवाहामध्ये आणून जी घाबरलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही पक्ष संपत नाही किंवा त्याचे विचार संपत नाही फक्त चढ-उतार असतात आणि त्यामध्ये टिकून राहणे हे आपले कार्यकर्त्यांचे काम आहे असे त्यांनी यावेळी सांगून गाव तेथे राष्ट्रवादी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच सांगितले की, शिवसेना व भाजप युती विरोधात सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे सांगून कडकनाथ कोंबडी संदर्भात जी फसवणुकीची प्रकरणे झाली आहेत ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असतील तर त्या शेतकऱ्यांनी पुढे यावे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना सर्वतोपरी मदत करेल आणि याबाबत पोलिसात तक्रार देण्यासाठी सहकार्य करेल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युती सरकारने आतापर्यंत फक्त घोषणाबाजी केली आहे पण कुठे काम दिसत नाही आता तर अर्थसंकल्प मांडून पूर्ण केला. आता सुद्धा नव्याने काही घोषणा केल्या आहेत यासाठी पैसा कुठून घेऊन येणार असा सवाल त्यांनी उपस्थित करून या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा आश्वासित विकास आणलेला नाही फक्त उद्घाटन करत आहेत त्यांचा प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here