ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक १५ सप्टेंबरला सत्कार…!

0
68
सावंतवाडी : दि. ११: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नाईक यांचा रविवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आरपीडी हायस्कूलच्या नवरंग सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, पालकमंत्री दीपक केसरकर, किरण ठाकूर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, विकास सावंत, अच्युत भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन लायन्स क्लब अध्यक्ष रविकांत सावंत, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here