पालकमंत्री केसकर यांनी केलीली जादू ही विकासाची जादू : अतुल बंगे

0
201

कुडाळ : दि ११ : गेले बरेच दीवस पालकमंत्री दिपक केसकर यांच्यावर जादु असल्याची टिका होत असल्याने शिवसेनेचे अतुल बंगे यांनी आज खडसुन समाचार घेत पालकमंत्री ना दिपक केसकर ही विकासाची जादु निश्चितच असुन कोणी एवढा निधि आणला नाही एवढा भरघोस निधी पालकमंत्री ना दिपक केसकर यांनी पाच वर्षांच्या काळात आणुन जादुच करुन दाखवली असल्याचे शिवसेनेचे अतुल बंगे यांनी सांगितले,ना केसरकर यांच्यावर टिका करताना विरोधकांनी तारतम्य बाळगणे महत्त्वाचे होते, त्यांच्या देवतांच्या श्रध्देवर टिका टिपणी करणे म्हणजे कडेलोट आहे, या जिल्ह्याला एक अभ्यासू पालकमंत्री मिळालेत, राज्याचे ग्रृह व वित्त हे अती महत्वाचे खाते अगदी प्रभावीपणे सांभाळून आज जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने यशस्वी कामगिरी करीत आहेत, यातच ना केसरकर यांची वाढलेली लोकप्रियता ही विरोधकांना पचनी पडत नाही यापुढच्या काळात आपली डाळ शिजणार नाही यासाठी केसरकर यांची प्रतीमा डागळण्यासाठी खटाटोप चालु आहेत परंतु सिंधुदुर्ग जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे शांत आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधीची गरज ओळखून सिंधुदुर्ग वासीय शिवसेना आणि ना केसरकर यांच्या पाठीशी राहीली आहे त्यामुळे अगदी निवडणुकीच्या तोंडावर ना केसरकर यांच्यावर कितीही शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही असेही श्री बंगे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here