वडील, मुलगा यांनी मिळून केला भाऊ व पुतणी यांच्यावर प्राणघातक हल्ला

0
90

देवगड : दि ११ : देवगड तालुक्यातील वानिवडे पावणाई लाडवाडी येथील आत्माराम नामदेव लाड यांनी आपला मुलगा आनंद आत्माराम लाड यांनी काही घरातील घरगुती वादावरून आपला भाऊ संजय नामदेव लाड व पुतणी सुश्मिता संजय लाड यांच्यावर घरातील लाकडी चौकटीत असलेल्या कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यांना मारण्याची धमकी दिली. अचानक झालेल्या या हल्ल्यात संजय व सुश्मिता यांना दुखापत झाल्याने उपचारासाठी त्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढे हलविण्यात आले आहे .हि घटना बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.या बाबतची तक्रार संजय लाड व सुश्मिता लाड यांनी देवगड पोलिसात दिली असून संजयचे भाऊ आत्माराम लाड व पुतण्या आनंद लाड यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबतचा अधिक तपास पोलीस नाईक दशरथ चव्हाण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here