बेंगलोर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंधुदुर्गच्या बॅ. नाथ पै. सेंट्रल स्कूलच्या २ संघानी केलं प्रतिनिधित्व

0
313

सिंधुदुर्ग : दि २६ : २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत बैंगलोर येथे झालेल्या ऑल इंडिया आंतरराष्ट्रीय स्तरावर १४ वर्षे वयोगटामध्ये फुटबॉल स्पर्धेत प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील बॅ. नाथ पै. सेंट्रल स्कूलच्या दोन संघांनी सहभाग दर्शवून प्रतिनिधित्व करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नावलौकिक वाढविल. या स्पर्धेत सांघिक रित्या दोन्ही संघांनी एकूण ६ सामने खेळून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर केले.  सर्वांसाठी ते प्रेरणादायी ठरले. मुलांमधील कौशल्ये जाणून घेण्यासाठी आणि ती विकसित करण्यासाठी क्रीडा प्रकारासारखा पर्याय नाही. खेळामधून जिद्द,उत्साह, आत्मविश्वास,संवेदनशीलता इ.कौशल्यांचा विकास होतो. यासाठी प्रशालेने शालेय मुलांना एक उत्तम संधी प्राप्त करून दिली. सिंधुदुर्गसारख्या भागातील मुलांना बैंगलोर येथे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा एक अविस्मरणीय अनुभव अनुभवता यावा हा यामागील उद्देश्य होता.प्रशालेचे क्रीडाशिक्षक जॉन्सन फर्नांडिस, प्रशालेचे शिक्षक प्रसाद कानडे,जागृती लोट, डेप्युटी मॅनेजर ऐंजलो पिंटो यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील संधीचा फायदा करीत कौतुकास्पद कामगिरी निभावली.शालेय जीवनातील क्रीडा हा अविभाज्य घटक आहे.विद्यार्थ्यांनी आपली एकी कायम ठेवून उत्स्फुर्तपणे सहभाग दर्शवून आपली जिद्द कायम ठेवावी अशा शुभेच्छा संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी दिल्या. मुख्य कार्यकरी अधिकारी अमृता गाळवणकर, व्यवस्थापकीय अधिकारी व्यंकटेश भंडारी,बॅ.नाथ पै सेंट्रल स्कुलच्या प्राचार्या सौ.स्वरा गावडे, मधुरा इन्सुलकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. फुटबॉल आय् लिगचे संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांना प्रशिक्षण देणारे, डेप्युटी मॅनेजर ऐंजलो पिंटो तसेच प्रशालेचे क्रीडाशिक्षक जॉन्सन फर्नांडिस यांचे मोलाचे मार्गदर्शन सहभागी विद्यार्थ्यांना लाभले. यामध्ये योगेश शर्मा,,अनुज भोगटे, अथर्व गावडे, अभिराज परब, श्रेयस चव्हाण, सचिन सैनी, हितेश सुरेला, हेमांग धोंड, राकेश साहू, संस्कार कदम, पियुष मेतर, अरबाज शेख, अरूण सैनी, वैभव सावंत, ओम आरोलकर,विराज ठाकूर हे विद्यार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here