भूतनाथ कला क्रीडा मंडळ निरवडे तर्फे खुली जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

0
280

सावंतवाडी : दि २९ : भूतनाथ कला क्रीडा मंडळ निरवडे तर्फे भव्य खुली जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ३ व ४ ऑक्टोबरला होणार आहे. ही स्पर्धा श्रीदेव भूतनाथ मंदिर येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००१ द्वितीय पारितोषिक ७००१ आणि तृतीय पारितोषिक ५००१ या रकमेची पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. तसेच इतर वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेसाठी इच्छुक भजन मंडळांनी एक ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या १३ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी उमाकांत गावडे9764283907, विनय गावडे9921637353, आणि काका गावडे 8484000057, 9527759589 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भूतनाथ कला क्रीडा मंडळ निरवडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here