विजू खोटे काळाच्या पडद्याआड…!

0
409

मुंबई : दि. ३० : मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणारे आणि शोले चित्रपटातील कालिया पात्र अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. खोटे यांनी हिंदी आणि मराठी अशा एकूण तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९६४ साली त्यांनी ‘या मालक’ सिनेमामधून सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ‘अनोखी रात’, ‘जिने की राह’, ‘पगला कही का’, ‘रामपूर का लक्ष्मण’, ‘शरीफ बदमाश’, ‘जलते बदन’, ‘बेनाम’, ‘जुर्म और सजा’, ‘इन्सानियत’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले. मात्र १९७५ साली आलेल्या ‘शोले’ या सिनेमातील त्यांची ‘कालिया’ ही भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील त्यांनी साकारलेली ‘बळी’ ही नकारात्मक भूमिकाही चांगलीच लक्षात राहिली. तसेच ‘अंदाज अपना अपना’मध्ये साकारलेला ‘रॉबर्ट’ही अनेकांच्या चांगलाच लक्षात राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here