मडूरेत नवरात्रोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

0
221

बांदा  : दि  ३० : मडूरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने रविवारी परबवाडी, देऊळवाडी व रेडकरवाडी भजन मंडळानी भजने सादर केली. सोमवारी इन्सुली येथील श्री देवी माऊली दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग संपन्न झाला.
मंगळवार १ अॉक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. गोवा येथील ह. भ. प. भास्कर साठे यांचे किर्तन तर रात्री ८.३० वा. चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. बुधवार २ रोजी रात्री ९ वा. माझ्या मित्राची बायको हे विनोदी नाटक होणार आहे. गुरूवार ४ रोजी सायंकाळी ७ वा. स्वररंग मयुर निर्मित भक्तीधारा, दांडीया नृत्य, महिलांची फुगडी व हळदीकुंकू कार्यक्रम होईल.शनिवार ५ रोजी सायंकाळी ७ वा. भजने व रात्री ९ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. रविवार ६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून दांडीया नृत्य व स्थानिकांचे विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here