लायसन्स क्लब सावंतवाडीच्या ‘शांती चित्र’ स्पर्धेला उदंड प्रतिसाद 

0
283

सावंतवाडी : दि ६ : लायसन्स क्लब सावंतवाडीतर्फे शांती चित्र (पीस पोस्टर) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हि स्पर्धा एकाचवेळी ७५ देशात घेतली जात असून सावंतवाडीतील बालकलाकारांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. आतापर्यंत देशातील ६ लाख विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. सावंतवाडीतील ११ ते १३ या वयोगटातील बालकलाकारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एका पेक्षा एक सरस आणि सामाजिक संदेश देणारी चित्र या कलाकारांनी रेखाटली. या स्पर्धेत प्रथम विजेत्यास अमेरिकन डॉलर ५००० अर्थात ३ लाख ५५ हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तसेच ज्या ठिकाणी बक्षीस समारंभ होणार असेल त्या देशाची ट्रीप असे बक्षिसाचे स्वरूप असणार आहे. २३ मेरीट विजेत्यास अमेरिकन डॉलर ५०० अर्थात ३५ हजार पाचशे रुपयांचं बक्षीस व प्रमाणपत्र दिल जाणार आहे. तर पीस पोस्टर चेअरमनतर्फे १०००, ७००, ५०० व ३०० रुपयांचे ४ प्राईज दिले जाणार आहेत. सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेलाही विद्यार्थ्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला. यावेळी लायसन्स क्लब अध्यक्ष रविकांत सावंत, लायनेस क्लब अध्यक्षा अपर्णा कोठावळे, सेक्रेटरी अशोक देसाई, ट्रेझर विद्युत तावडे, संतोष चोडणकर, बाळासाहेब बोर्डेकर, गजानन नाईक, रवी स्वार, सुनिता टकेकर, प्रशांत कोठावळे, बांदेकर फाईन आर्ट्स प्राचार्य धोपेश्वरकर, प्रा. मोरजकर, प्रा. पोपकार, प्रा. नेरुरकर आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here